मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने 12 एप्रिल ते 30 जून या कालावधीत आपल्या ग्राहकांसाठी अमृत कलश मुदत ठेव योजना पुन्हा सुरू केली आहे.
ही स्कीम ठराविक कालावधीसाठीच असणार आहे. या स्कीममध्ये ज्या ग्राहकांनी पैसे गुंतवले आहेत त्यांना तीन महिन्याला किंवा सहा महिन्यांसाठी चांगले रिटर्न्स देखील मिळणार आहेत.
ज्यांचं या बँकेत खातं आहे ते सगळे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अमृत कलश मुदत ठेव योजनेंतर्गत, तुम्ही ४०० दिवसांसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता.
अमृत कलश योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत नोंदणी केल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या महिन्यांच्या अंतराने व्याज दिलं जातं.
अमृत कलश FD योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. ग्राहक या फिक्स्ड डिपॉझिटवर कर्ज घेऊ शकतात. आयकर कायद्यानुसार मिळालेल्या व्याजातून टीडीएस कापला जाईल.
ही योजना दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी FD करण्याची मुभा देण्यात आली आहे. NRI देखील यामध्ये पैसे गुंतवू शकतात. खातेदारांसाठी FD आणि विशेष FD ची सुविधा देण्यात आली आहे.
ही स्कीम ठराविक मुदतीपुरतीच असणार आहे. 30 जून अंतिम मुदत असून त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची महत्त्वाची आहे.