मुंबई : बऱ्याचदा असं होतं की कस्टमर केअरचे नंबर आपल्याला सापडत नाहीत. मग अशावेळी आपण गुगलची मदत घेतो. गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधतो.
SBI ने आपल्या निवदेनात म्हटलं आहे की, प्रिय SBI क्रेडिट कार्ड धारक, ग्राहक सेवा क्रमांक शोधण्यासाठी कधीही सर्ज इंजिन किंवा गुगलचा वापर करू नका.
सध्या ऑनलाईन फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि असे नंबर शोधण्यापासून सावध व्हा. नाहीतर तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.