मुंबई : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेड रिझर्व्ह बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता RBI पुन्हा एकदा आपल्या रेपो रेटमध्ये वाढ करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मंथली मॉनेटरी पॉलिसी 25 बेसिस पॉइंटने वाढ करेल असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी MPC ची पहिली बैठक 3 एप्रिल रोजी सुरू होत आहे.
मॉनेटरी पॉलिसी समिती बारकाईने विचार करेल असे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे उच्च किरकोळ चलनवाढ आणि विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनी, विशेषतः यूएस फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी वाढ केली आहे.
आतापर्यंत 6 वेळा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे EMI वाढला आता पुन्हा एकदा EMI वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं टेन्शन वाढलं आहे.