मुंबई : मॉनेटरी पॉलिसीसंदर्भात पुन्हा एकदा RBI ची तीन दिवस महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. 8 फेब्रुवारीला रेपो रेट संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
2/ 8
RBI पुन्हा एकदा मंदीचं सावट, महागाई आणि एकूण सध्याचा विचार करता 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेट वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर असाच रेपो रेट वाढला तर होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन आणि त्यासोबत EMI देखील महाग होऊ शकतात.
3/ 8
केल्यानंतर 1100 रुपयांनी EMI महाग झाला होता. आता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.
4/ 8
घर, कार आणि लोन घेणं महाग होऊ शकतं. 0.25 बेसिस पॉईंटने वाढ झाली तर तुमचा EMI देखील वाढू शकतो. डिसेंबर महिन्यात 0.35 बेसिस पॉईंटने वाढ
5/ 8
गेल्या वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने अल्प मुदतीच्या कर्जदरात 225 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
6/ 8
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले होतं. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जागतिक बाजारपेठेतील एकूण आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही.
7/ 8
भारतातील महागाईच्या दरावर अंशत: नियंत्रण मिळवलं आहे. मात्र अजूनही स्थिती सुधारण्यासाठी 6 महिने ते एक वर्ष काळ जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा तिमाहीनंतर रेपो रेटमध्ये वाढ होऊ शकते आणि त्यानंतर स्थिती स्थिर राहील असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
8/ 8
या एकूणच परिस्थितीवर RBI कडून 8 फेब्रुवारीला काय निर्णय येतो आणि पुढचे काय संकेत मिळतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.