US फेडने पुन्हा एकदा आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यानंतर आता RBI चा मोठा निर्णय आज होणार आहे. हा निर्णय तुमचं बजेट बिघडवण्याची शक्यता आहे. आज RBI पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
सकाळी 10 वाजत RBI आपला निर्णय जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार RBI ०.२५ बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
RBI च्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होण्याची शक्यता आहे.