RBI ची सध्या महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. याआधी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI ने 4 वेळा रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे बँकांनी व्याजदर वाढवला असून त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे.
2/ 6
EMI आणि लोन घेणाऱ्यांचे हप्ते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पुन्हा एकदा RBI रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे.
3/ 6
RBI पुन्हा 0.25 ते 0.35 टक्के रेपो रेट वाढवण्याच्या तयारीत आहेत. तर पुन्हा फेब्रुवारीमध्ये रेपो रेट वाढेल असे संकेतही मिळाले आहेत.
4/ 6
मे महिन्यापासून रेपो दरात 1.90 टक्के वाढ केली आहे. जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.
5/ 6
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. पंत यांच्या म्हणण्यानुसार, महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात RBI 0.25 टक्क्यांनी रेपो रेट वाढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता EMI देखील वाढणार आहेत.
6/ 6
महागाई येत्या काळात कमी होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असं असलं तरी व्याजदरात दिलासा मिळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती सध्या मिळाली नाही.