तुम्ही जर सरकारी बँकेत समजा पैसे ठेवले आणि काही कारणांमुळे जर RBI ने सहकारी बँकेवर निर्बंध लावले तर तुमचे पैसे अडकले. तर मग अशावेळी तुम्ही काय करणार? पैसे किती काढता येतात किंवा अगदीच पैसे काढायचे असतील तर नियम काय आहे? याबाबत जाणून घेऊया.
2/ 6
RBI ने किती कठोर निर्बंध लावले यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक बँकेनुसार हा नियम बदलण्याची शक्यता आहे.
3/ 6
काहीवेळा RBI दंड लावते आणि मोठे व्यवहार करण्यावर निर्बंध घालते. अशावेळी ग्राहकांना बँकेतून मोठी रक्कम काढता येत नाही, किंवा हस्तांतर करता येत नाहीत.
4/ 6
नुकतेच RBI ने 5 सहकारी बँकांवर निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादमधील सहकारी बँकेचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
5/ 6
ग्राहकांना 5 हजार रुपये काढता येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
6/ 6
RBI च्या परवानगी शिवाय कोणतेही कर्ज देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. याशिवाय कोणतीही गुंतवणूक करता येत नाही. मोठी रक्कम ट्रान्सफर करता येत नाही.