मुंबई: बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेनं अलर्ट जारी केला आहे. पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अजूनही असे काही ग्राहक आहेत ज्यांनी KYC अपडेट केला नाही.
ज्यांनी अजूनही KYC पूर्ण केलं नाही त्यांना बँकेनं इशारा दिला आहे. बँकेने १२ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर KYC नं केलेल्या ग्राहकांचं बँक खातं बंद केलं जाणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेने एसएमएस, ई-मेल आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केवायसी अपडेटसाठी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. या मुदतीपूर्वी ज्या ग्राहकांनी केवायसी अपडेट केले नाही, त्यांना बँकिंग आणि व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात.
अशा ग्राहकांना कोणतीही देवाण घेवाण अथवा बँकेतून व्यवहार करता येणार नाहीत. जर तुम्ही अजून केवायसी केलेलं नसेल तर या अडचणी टाळण्यासाठी तुमचं खातं केवायसी लवकर अपडेट करून घ्या.
KYC अपडेट करणं आता बंधनकारक असल्याचं RBI ने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये म्हटलं आहे. फसवणूक टाळण्यासाठी आणि खरी ओळख पटवण्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे. याबाबत बँकेनं ट्वीट करूनही माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही KYC केलं नसेल तर लगेच करा.