अर्थसंकल्पात टीडीएसबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2023 नंतर तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढल्यास, आता तुम्हाला 30% ऐवजी 20% दराने TDS भरावा लागेल.
2/ 6
तुमचे खाते पॅन कार्डशी लिंक आहे की नाही हे देखील फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 1 एप्रिल 2023 पूर्वी EPF मधून पैसे काढले तर तुम्हाला TDS भरावा लागेल.
3/ 6
खातेदाराने ५ वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. त्याच वेळी, 5 वर्षानंतर पैसे काढण्यावर कोणताही टीडीएस लावला जाणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात माहिती दिली होती की TDS साठी 10,000 रुपयांची मर्यादा देखील काढून टाकण्यात आली आहे.
4/ 6
लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, कर तज्ज्ञ बलवंत जैन म्हणतात की, पॅन आधारशी लिंक केलेले नसल्यास, पीएफ किंवा ईपीएफ खाते उघडण्याच्या पाच वर्षापूर्वी पैसे काढल्यास त्यावर कर आकारला जाईल.
5/ 6
पीएफ खाते खातेधारकाच्या पॅनकार्डशी जोडलेले असल्यास, काढलेल्या रकमेवर कोणताही टीडीएस आकारला जाणार नाही. पीएफमधून काढली जाणारी रक्कम त्या वर्षाच्या खातेधारकाच्या एकूण करपात्र उत्पन्नात जोडली जाईल आणि पीएफ खातेदाराच्या आयकर स्लॅबनुसार कर आकारला लावला जाईल.
6/ 6
बळवंत जैन यांच्या मते ज्यांचं PF खातं अजूनही पॅनकार्डशी लिंक केलं नसेल तर टीडीएस कापला जातो. सध्या टीडीएस 30 टक्के कापला जातो तो कमी करुन 20 टक्क्यांवर आणला आहे. हा नियम 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.