एफडी म्हणजे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक अशी एक धारणा फार पूर्वीपासून चालत आली आहे. बरेच जण मोठी एफडी दीर्घ मुदतीसाठी ठेवतात. ती एफडी पूर्ण झाली की खात्यावर हवी तेवढी रक्कम काढून घेतात आणि पुन्हा एफडीमध्ये पैसे गुंतवतात. त्यात पैसे गमावण्याची भीती नसते. मात्र, एफडीवरील कमी परताव्याची समस्या कायमच असते.
मात्र आज आम्ही तुम्हाला अशा बँका सांगणार आहोत ज्या 6 किंवा 7 टक्क्यांहून अधिक व्याजदर आपल्या ग्राहकांना देत आहेत. दीर्घकालीन मुदतीवर या बँका व्याज देतात. कोणत्या बँका आहेत ज्या जास्त व्याजदर देतात जाणून घेऊया.
कॅनरा बँक- ही बँक 3.25 पासून 6.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. याशिवाय 666 दिवसांसाठी FD ठेवणाऱ्यांना 7 टक्क्यांनी व्याजदर देत आहे. (news18)
बँक ऑफ बडोदा- या बँकेनं तिरंगा प्लस एफडी स्कीम आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 7.05 टक्के व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळेल. (news18)
पंजाब नॅशनल बँक- या बँकेनं ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. 666 दिवसांच्या FD वर 7. 25 टक्के व्याजदर दिलं जात आहे. याशिवाय 8 टक्क्यांपर्यंत हे व्याज वाढवण्यात आलं आहे.
ICICI- १५ महिने ते 5 वर्षांच्या FD साठी ही बँक 7 टक्के व्याज देत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी 7 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहे.
अॅक्सिस बँक - खासगी बँकांमधील आणखी एक बँक म्हणजे अॅक्सिस बँक. 2 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँक 7 टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि 2 कोटींहून अधिक रक्कम ठेवणाऱ्यांनाही ही बँक चांगले व्याजदर देत आहे.