तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असायलाच हवा. कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. खरं तर, कार असण्याचे अनेक फायदे आहेत.
मध्यमवर्गीयांना गाड्यांच्या किमती आणि त्यासंबंधित खर्चामुळे अनेकदा वेठीस धरले जाते. त्यामुळे कार घेण्याचे स्वप्न कधीकधी पूर्ण होऊ शकत नाही. पण आजकाल कार लोन किंवा कार लोन घेणे सोपे झाले आहे. विविध बँका आणि वित्तीय संस्था ही कर्जे देतात. कार घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं फक्त त्यासाठी तुम्ही काही नियोजन करायला हवं.
कार लोन घेताना EMI चा बोजा वाढला तर आपल्यावर ताण येतो आणि बजेट बिघडतं मग ही गोष्ट टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत त्या पाळल्या तर EMI चा ताण येणार नाही.
20/10/4 या फॉर्म्युल्याने तुम्ही तुमची ड्रीम कार खरेदी करू शकता. त्यामुळे तुमच्या खिशावरही ताण पडणार नाही. कार घेताना तुम्ही 20 टक्के आधीच डाऊन पेमेंट करा. ऑनरोड किंमतीच्या 20 टक्के किंमत कार बुक करताना केल्याने तुम्हाला फायदा होईल.
10 टक्के तुमचा EMI असायला हवा. हा EMI तुमचं सगळं बजेट बसल्यानंतर किती येतो त्याचा हिशोब काढा. हा EMI तुम्ही चार टर्ममध्ये भरायचा आहे. तुम्ही जेवढी वर्ष किंवा महिने वाढवाल तेवढं व्याज जास्त वाढत जाईल.
EMI खूप मोठा असेल तर त्याचा कालावधी 4 वर्षांपेक्षा जास्त असू नये. हे धोरण सर्वांनाच मान्य नसेल असे म्हणणे रास्त आहे. हे खरं तर उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र तरीही हा प्रयत्न केला तर तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही आणि तुमचं स्वप्नही पूर्ण होईल.