आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. कच्चे तेल 75 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं आहे. सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. देशातील एका शहरात तर 108 रुपयांच्या वर पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. तुमच्या जिल्ह्यात नक्की काय स्थिती आहे किती महाग झालं पाहा.
यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी महाग झाले असून ते 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. बिहारची राजधानी पाटणामध्ये आज पेट्रोल 32 पैशांनी महागले असून ते 108.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
डिझेलही 30 पैशांनी वाढले असून 94.86 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्येही आज पेट्रोल 4 पैशांनी महाग झाले असून ते 96.93 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 4 पैशांनी महागून 89.80 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दर आहेत.
रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. तुम्ही SMS द्वारे घरबसल्या तुमच्या शहरातील हे नवे दर चेक करू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.