पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी बुधवार, 5 एप्रिल 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत.
चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 113 पर्यंत पोहोचलं आहे.
गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
पोर्ट ब्लेअर इथे पेट्रोल 84.10 रुपयांना मिळत आहे. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दर आहेत. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दर आहे.
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.