मुंबई : महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. क्रूड ऑईलचे दर 87 डॉलरच्या वर गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेल देखील महाग झालं आहे. भारतातील काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती 50 पैशांनी वाढल्या आहेत. तुमच्या शहरात काय स्थिती आहे जाणून घेऊया.
गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही हे दिसून आले आणि आज पाटणा, गुरुग्रामसह देशातील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
पटनामध्ये पेट्रोल 50 पैशांनी महाग झालं असून नागरिकांना 107.74 रुपये लिटरमागे मोजावे लागत आहेत. तर डिझेल 48 पैशांनी वाढून 94.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
गुरुग्राममध्ये पेट्रोल 49 पैशांनी महाग झालं आहे. तिथल्या लोकांना 97.38 रुपये लिटरमागे मोजावे लागत आहेत. डिझेल 48 पैशांनी वाढले असून 90.24 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.
जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता इथे पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. हे दर स्थिर आहेत.
जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता इथे पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. हे दर स्थिर आहेत.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाने RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.