फिक्स डिपॉझिट ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. त्यामुळे बऱ्याचदा ठराविक रक्कम FD मध्ये ठेवण्याकडे कल असतो.
तुम्ही जर तुमच्या पगारातील काही हिस्सा हा FD करण्याचा विचार करत असाल किंवा केला असेल तर तुम्ही ही चूक केली नाही ना हे एकदा चेक करा.
तुमच्याकडे पैसे आहेत ते एकत्र FD मध्ये ठेवू नका. तर त्याला लॅडरींग पद्धतीने गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. पैसेही दुप्पट होतील आणि फायदाही मिळेल.
समजा तुमच्याकडे 6 लाख रुपये असतील तर त्याचे तीन भाग करा. 2 लाख रुपयांची एफडी एक वर्षांसाठी ठेवा. दुसऱ्या 2 लाख रुपयांची एफडी दोन वर्षांसाठी आणि आणखी दोन लाख रुपये तीन वर्षांसाठी ठेवा.
जेव्हा 1 वर्षाने तुमची एफडी मॅच्युअर होईल तेव्हा पुन्हा तुम्ही 3 वर्षांसाठी ती अपडेट करा. असच तुम्हाला उरलेल्या दोन एफडीसाठी देखील करायचं आहे.
यामधून तुम्हाला लिक्विडिटी पण मिळेल आणि बँकेनं व्याजदर बदलला तर तुम्हाला त्यानुसार 3 वर्षांसाठी जास्तीचा व्याजदर देखील FD वर घेता येईल.