तुमच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजूनही गाफिल असाल तर सावधान! तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. तुमचं खातं बंद होण्याची शक्यता आहे.
2/ 7
तुम्हीही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सर्व डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खातेधारकांना डिमॅट खाते नॉमिनी देणं अनिवार्य केलं आहे.
3/ 7
जो डिमॅट खातेधारक नॉमिनी जोडणार नाही त्याचं खातं बंद केलं जाणार आहे.
4/ 7
डिमॅट खात्यात नॉमिनी जाहीर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. तुम्ही अजूनही जर नॉमिनी जोडला नसेल तर तुम्ही लगेच जाहीर करा. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.
5/ 7
याआधी नॉमिनी जाहीर करण्याची अंतिम मुदत मार्च 2022 होती. मात्र सेबीने वेगवेगळ्या भागधारकांशी सल्लामसलत करून ही तारीख एक वर्षाने वाढवली.
6/ 7
ज्यांनी आधीच नॉमिनी जाहीर केला आहे त्यांना पुन्हा नॉमिनी जाहीर करण्याची आवश्यकता नाही. जे नवीन खातं सुरू करणार आहेत त्यांनी नॉमिनी देणं आवश्यक आहे. तर ज्यांचं खातं आहे त्यांनी नॉमिनी 31 मार्चपर्यंत नॉमिनी जाहीर करावा.
7/ 7
तुम्ही 31 मार्चआधी नॉमिनी जोडला नाही तर मात्र तुमचं डिमॅट अकाउंट बंद होणार आहे. त्यामुळे तातडीनं नॉमिनी जाहीर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.