मुंबई : करोडपती व्हावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाचं स्वप्न असतं कमी वयात करोडपती व्हायचं तेच स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्यासाठी तुम्ही फक्त गोल्डन रुल समजून घेतला पाहिजे.
आपल्या सर्वांना असे वाटते की दीर्घ मुदतीत लाखो कोटींचा निधी मिळवायचा असेल तर दरमहा प्रचंड पैसा गुंतवावा लागेल, पण तसे नाही. पगारातून किंवा व्यवसायातील उत्पन्नातून दर महिन्याला काही रक्कम गुंतवून तुम्ही करोडपती होऊ शकता.
यासाठी बाजाराच्या जोखमीच्या अधीन असलेल्या म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 15*15*15 नियमाद्वारे करोडपती कसं व्हायचं ते समजून घ्या.
म्युच्युअल फंडातील एसआयपी ही एक मोठी गोष्ट आहे. कारण यामध्ये गुंतवणूक एकरकमी नाही तर तुकड्यांमध्ये केली जाते आणि दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा देते. म्युच्युअल फंडामध्ये जोखीम आणि कार्यकाळानुसार अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता.
15*15*15 हा गुंतवणुकीच्या नियोजनासंबंधीचा एक लोकप्रिय नियम आहे, ज्याच्या मदतीने दीर्घ मुदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी सहज उभा करता येऊ शकतो. तुम्ही फक्त 15% परतावा देणार्या म्युच्युअल फंड योजनेत 15 वर्षांसाठी दरमहा रु 15,000 गुंतवा. यातूनच 1 कोटींचा मोठा फंड तयार होईल.
म्युच्युअल फंड दीर्घ मुदतीत 15% पर्यंत परतावा देऊ शकतात. नियम 15*15*15 नुसार, जर तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा रु 15,000 ची गुंतवणूक केली जी तुम्हाला 15 टक्के रिटर्न सहज मिळवून देईल अशी असेल तर तुम्हाला शेवटी रु. 1,00,27,601 मिळतील.
यामध्ये तुम्हाला केवळ 27 लाख रुपयांची गुंतवणूक करायची आहे, कंपाउंगि इंटरेस्ट पकडून तुम्हाला एकूण 73 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.
जर तुम्ही 15-15-30 अशी गुंतवणूक केलीत तर तुमच्याकडे 10 कोटी रुपयांची रक्कम जमा होईल म्हणजेच तुम्ही करोडपती व्हाल. मात्र तुम्हाला त्यासाठी आतापासून एवढी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये जमा करावी लागेल.