गोल्ड लोन घेण्यापूर्वी सर्व बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी जाणून घेणे फायदेशीर ठरते. विविध बँकांच्या गोल्ड लोनचे व्याजदरही वेगवेगळे असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 बँकांबद्दल सांगणार आहोत, जे सर्वात स्वस्त गोल्ड लोन देत आहेत.
HDFC Bank : सध्या सर्वात कमी व्याजदराने गोल्ड लोन दिले जात आहे. बँकेचा गोल्ड लोनचा व्याजदर 7.60 टक्क्यांपासून सुरू होतो. कमाल व्याजदर 17.05आहे. व्याज हे कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते. बँक एकूण कर्जाच्या रकमेच्या 1 टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारत आहे.
Central Bank of India : या बँकेत गोल्ड लोन 8.45 टक्क्यांपासून सुरू होतं. ग्राहकांना 10 हजार ते 40,00000 रुपयांपर्यंत इथे लोन उपलब्ध करून दिलं जातं. याशिवाय बँक 0.50 टक्के प्रोसेसिंग फी घेते.
Federal Bank : या बँकेचं नाव स्वस्त गोल्ड लोन देणाऱ्या बँकेच्या यादीमध्ये आहे. बँक 8.64 टक्के व्याजदराने गोल्ड लोन देते. जेवढी रक्कम जास्त आणि टेन्यूअर वाढेल तेवढं व्याजदरही वाढत जाईल.
Indusind Bank : गोल्ड लोनचं व्याजदर 8.75 टक्के ते 17 टक्क्यांपर्यंत आहे. ही बँक गोल्ड लोनसाठी 1 टक्के प्रोसेसिंग फी देखील घेते.