Personal Finance : आजकाल क्रेडीट कार्डचा वापर जवळपास प्रत्येकजण करतो. बँकांकडूनही यासाठी विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिलं जातं. क्रेडीट कार्डवरून खरेदी केल्यास बँक त्या पैशांवर ३० ते ४५ दिवसांपर्यंत व्याज घेत नाही. तसच क्रेडिट कार्डवरून पैसे भरल्यास अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटसुद्धा ग्राहकांना मिळतो.
मिनिमम ड्यू किमान थकीत रक्कम असते ज्याची परतफेड न केल्यास तुमच्या व्याजासह बँक पेनल्टीही लागते. मिनिमम ड्यू तुम्ही खर्च केलेल्या एकूण रकमेच्या जवळपास ४ ते ५ टक्के असते. मिनिमम ड्यू रक्कम भरल्यानंतर मोठी रक्कम परतफेड करण्याच्या दबावातून एकदा वाचता. पण हे ग्राहकाच्या फायद्याचं आहे असं म्हणता येणार नाही.