तुम्हाला बँकेत पॅनकार्ड देणं बंधनकारक आहे. याबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
20 हजार रुपयांपर्यंत जर नोटा बदलायच्या असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही.
50 हजार रुपयांपर्यंत जर रक्कम असेल तर पॅनकार्डची कॉपी बँकेत जमा करणं बंधनकारक आहे. डिपॉझिट आणि एक्सचेंजवर जुने नियम लागू असतील.
कोणत्याही बँक, कॉर्पोरेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करण्यासाठी पॅन-आधार आवश्यक आहे.
एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये रोख काढण्यासाठी देखील पॅनकार्ड आवश्यक आहे.
बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडताना पॅन-आधार देणे बंधनकारक असणार आहे.