ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या नावात तुम्हाला चूक आढळली आली तर ते उत्पादन बनावट असण्याची शक्यता आहे. अनेक वेळा काही कंपन्या ब्रँडच्या नावासारखी नावे ठेवून ग्राहकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. ब्रँडेड उत्पादने ज्या नावाने येतात, त्या नावाची खास ओळख असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.
प्रत्येक ऑनलाइन साइटवर उपलब्ध असलेल्या उत्पादनांबद्दल कस्टमर रिव्ह्यू देखील असतात. यामुळे तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तूची तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आपल्याला रिव्ह्यू आवडला नाही तर असं प्रॉडक्ट खरेदी करणे टाळा.
ऑनलाइन शॉपिंग नेहमी सुप्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून करा. कारण या कंपन्यांचा युजर बेस खूप मोठा आहे, त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ते त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलतात.
तुम्ही नवीन वेबसाइटवरून खरेदी करत असाल तर थोडी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण येथे बनावट वस्तू मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. अनेक वेळा पैसे भरल्यानंतर उत्पादन मिळेल की नाही, अशी भीती असते. म्हणूनच कंपनीशी संबंधित रिव्ह्यू पाहिल्यानंतर खरेदी करणे चांगले आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स साइटवरून एखादे उत्पादन ऑर्डर कराल तेव्हा डिलिव्हरीदरम्यान वस्तू पूर्णपणे तपासा. वस्तू चुकीची असल्यास डिलीवरीला आलेल्या व्यक्तीसमोर त्याचा व्हिडीओ तयार करा. (क्रेडिट-पिक्सबे)