गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांनी FD च्या व्याजदरात वाढ केली आणि लोक fd मध्ये खूप जास्त पैसे गुंतवायला लागले. पण तुम्हाला माहिती आहे का? व्याजदर हे कमी जास्त होत असतात, मात्र सरकारच्या काही अशा योजना आहेत ज्यांचा लॉकिंग कालावधी जास्त आहे आणि मिळणारे रिटर्न्सही जास्त आहेत. तुम्ही कसा फायदा घेऊ शकता जाणून घ्या.
या सरकारी योजनांमध्ये तुम्हाला 8.2 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना विमा सुरक्षा देखील असणार आहे.
किसान विकास पत्र ही सर्वात प्रसिद्ध योजना आहे. यामध्ये लाँग टर्मसाठी सेविंग करणं आवश्यक आहे. यावर 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे.
स्मॉल सेविंग स्कीममध्ये पोस्ट ऑफिसची नॅसनल सेविंग सर्टिफिकेट योजना आहे. यामध्ये 5 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.7 टक्के व्याजदराने रिटर्न्स मिळणार आहेत.
सरकारची आणखी एक बेस्ट सेविंग स्कीम म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. मुलींच्या भविष्यासाठी त्यांच्या नावाने ठराविक रक्कम तुम्ही बँकेत ठेवू शकता. सरकार यावर 8 टक्के व्याजदर देते.
PF फंड ही सरकारची सर्वात बेस्ट योजना समजली जाते. या योजनेत तुम्ही दीड लाखापर्यंत रक्कम गुंतवू शकता. यावर 7.1 टक्के रिटर्न्स यावर मिळतात. फक्त एकच गोष्ट आहे की यामध्ये तुम्हाला 15 वर्षांपर्यंत पैसे काढता येत नाहीत. शिवाय तुम्ही 10 वर्ष ही रक्कम पुढे अजून वाढवू शकता.