ऊन आणि पाऊस असं विचित्र वातावरण सध्या झालं आहे. पाऊस जरी पडत असला तरी देखील उष्णता वाढत आहे. त्यामुळे घरात आता एसी हवा असं वाटायला लागलं आहे. काहीजण एसी घेण्याच्या मागावर आहेत तर काहींनी आधीच घेतला आहे. आता विजबिलात देखील वाढ होणार असल्याची 1 एप्रिलपासून चर्चा आहे. एसी म्हटलं की विजबिल जास्त येतंच.
तुमचा AC १८ डिग्रीवर ठेवण्यापेक्षा 24 डिग्री सेल्सियसवर ठेवा. दिवसा तापमान 34 ते ३८ डिग्रीपर्यंत असतं. त्यासोबत आपल्या शरीराचं तापमान 36 ते 37 डिग्री असतं. या खाली असलेलं तापमान हे नेहमी आपल्या शरीरासाठी थंडच असतं. त्यामुळे त्यामिुळे साधारण 23-24 वर एसी ठेवला तर योग्य कूलिंग होतं आणि बिलही वाढत नाही.
AC सुरू असताना इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करणं टाळलं पाहिजे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या रुममध्ये AC सुरू आहे ती खोली नीट बंद करून घेणं आवश्यक आहे. सूर्याच्या किरणांनी एसीवरचा लोड वाढतो. याशिवाय एसी सुरू असताना इतर इलेक्ट्रिक उपकरणं वापरली तर घरातील उष्णता वाढते. त्यामुळे खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ जातो.
एसीसोबत पंख्याचाही उपयोग करा. एसीचं तापमान कमी न ठेवता 24 वर ठेवावं आणि त्यासोबत पंखा सुरू ठेवा म्हणजे रुम थंड राहील. तुम्ही थोड्यावेळानं एसी बंद करू शकता. दुसरं म्हणजे एसी सुरू करण्याआधी पंखा थोडावेळ चालू ठेवा ज्यामुळे रुममधील गरम हवा बाहेर जाईल आणि त्यानंतर एसी सुरू करा म्हणजे रुम लगेच थंड होईल.