कामगार मंत्रालयाने नवीन गाइडलान्स जारी केल्या आहेत. कामगार मंत्रायलाशी संबंधित असणाऱ्या DGHS अर्थात Directorate General of Health Services ने सुरक्षित वर्कप्लेससाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
या गाइडलान्सनुसार कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग आणि कंपनीच्या नियमांचे पालन करणे आवश्यकअसेल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर देखील ठेवली जाईल. या नियमांचे पालन न केल्यास तुमचे अप्रेजल थांबवले जाऊ शकते.
यामध्ये खाजगी कंपन्यांना इंडस्ट्री एचआर पॉलिसीमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य वीमा आवश्यक करण्यात आला आहे.
कोरोना काळात कंपन्यांनी Special Leave Policy बनवाव्यात. त्यांनी जवळच्या हॉस्पिटलशी टायअप करून घ्यावे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी शक्यतो खाजगी वाहने किवा सायकलचा वापर करावा.
या नवीन नियमांनुसार कामाच्या ठिकाणी शक्यतो जिन्याचा वापर करावा. लिफ्टचा वाप करत असल्यास एकावेळी 2 ते 4 लोकांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी. या नियमात असे म्हटले आहे की. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे आई-वडील दोघे काम करत असतील, तर त्यांना वर्क फ्रॉम होण करण्याची परवानगी द्यायला हवी. त्याचप्रमाणे 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना घरूनच काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ऑफिसमध्ये आवश्यक प्रमाणात हँड सॅनिटायझर (स्पर्शाशिवाय वापरता येईल असा) आणि थर्मल स्क्रिनिंग असणे गरजेचे आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पिक अँड ड्रॉप सेवा दिली जाते त्यांना छोट्या वाहनांऐवजी एसी बससारखी मोठी वाहनं उपलब्ध करून द्यावी आणि त्यामध्ये त्या वाहनाच्या क्षमतेच्या केवळ 30-40 टक्के कर्मचाऱ्यांनाच बसवले जावे.