तुम्ही म्हाडाच्या घरासाठी जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. म्हाडाच्या अर्जाची मुदत आणि पेमेंट करण्याची मुदत संपली आहे. आता प्रतीक्षा लॉटरीची आहे. यासोबत ज्यांना घर लागणार नाही त्यांनी रिफंड कधी मिळणार या सगळ्या तारखा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
म्हाडाच्या घरासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही या तारखांवर लक्ष ठेवायला हवं. 13 फेब्रुवारी रोजी ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश तर 15 फेब्रुवारी रोजी फायनल अॅप्लिकेशन होणार आहे.
17 फेब्रुवारी रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर 20 फेब्रुवारीपासून ज्यांना घरं लागली नाहीत त्यांना रिफंडची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
अर्ज करणाऱ्यांसाठी तुमचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, 15 वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा आणि कोट्यातून घर घेत असाल तर त्यासंबंधित कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पुढची प्रक्रिया केली जाईल.
म्हाडाची लॉटरी तुम्ही ऑनलाईन देखील पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर housing mhada gov in जायचं आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर विभागातील घरांसाठी यावेळी म्हाडाने लॉटरी काढली आहे. याचा निकाल 17 फेब्रुवारीला लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांना 17 फेब्रुवारीची प्रतीक्षा आहे.