तुम्ही इन्स्टा किंवा फेसबुक वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्हाला आता 699 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र त्यासाठी काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहेत. या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल
इन्स्टा आणि फेसबुक वापरणं तुम्हाला महागात पडू शकतं. Meta ने ब्लू टिकच्या सब्स्क्रिप्शनसाठी 699 रुपये भारतातही लागू केले आहेत.
ट्विटरपाठोपाठ आता फेसबुक आणि इन्स्टा वापरणाऱ्या युजर्सना पैसे मोजावे लागणार असल्याने काहीशी नाराजी युजर्समध्येही आहे. ज्यांना ब्लू टिक किंवा व्हेरिफाइड अकाउंट हवं आहे अशा युजर्सना पैसे भरावे लागणार आहेत.
यामध्ये ब्लू टिकसोबत इतर काही खास फीचर्सचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे. iOS आणि अॅन्ड्रॉइड दोघांसाठी देखील मंथली सब्स्क्रिप्शनसाठी 699 रुपये भरावे लागणार आहेत.
युजर्सचं अकाउंट रिअल असल्याचा दाखवावं लागेल. यासोबत तुम्हाला ओळखपत्र सादर करावं लागेल. त्यामुळे पेड सर्व्हिस चालू केल्यानंतर फ्री ब्लू टिक सेवा बंद करण्यात आली.