आपण कार किंवा बाईक विकत घेताना किती मायलेज देते याचा विचार करतो. दररोज कोट्यवधी भारतीय त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात, परंतु बहुतेक लोकांना भारतीय रेल्वे किंवा ट्रेनशी संबंधित काही मनोरंजक माहिती माहित नसते.
2/ 8
प्लॅटफॉर्मवरील बोर्डवर स्टेशनची उंची समुद्रसपाटीपासून का लिहिली आहे, ट्रेनच्या डब्याच्या मागे X चिन्ह का आहे? असे इतर अनेक प्रश्न आहेत ज्यांची आपल्याला अजिबात माहिती नाही. १ लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती किलोमीटर धावते माहित आहे का?
3/ 8
कार, ट्रक, बस आणि स्कूटरपर्यंतच्या सर्व वाहनांचे मायलेज आहे, जेणेकरून एक लिटर पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती किलोमीटरचे अंतर जाते हे समजतं. पण ट्रेनचे मायलेज किती आहे याचा विचार केला आहे का?
4/ 8
वाहनांप्रमाणेच, ट्रेनचे मायलेज देखील अनेक घटकांवर अवलंबून असते आणि त्याला अनेक मानके जोडलेली असतात. ट्रेनचे मायलेज थेट सांगणे खूप अवघड आहे, कारण ट्रेनचे मायलेज हे मार्ग, पॅसेंजर ट्रेन, एक्स्प्रेस किंवा ट्रेनच्या डब्यांच्या संख्येवर अवलंबून असतं.
5/ 8
ट्रेनच्या मायलेजचा सर्वात मोठा भाग म्हणजे ट्रेनला किती डबे जोडले आहेत. कमी कंपार्टमेंट्समुळे इंजिनवर जास्त भार पडत नाही. या प्रकरणात इंजिनची शक्ती वाढते. डिझेल इंजिन ट्रेनचे मायलेज प्रति तासाच्या आधारे मोजली जाते. (फोटो क्रेडिट - रेल्वे मंत्रालय ट्विटर)
6/ 8
मिळालेल्या अहवालानुसार ज्या गाड्यांमध्ये 24-25 डबे आहेत. अशा ट्रेनला 1 किलोमीटरसाठी 6 लिटर डिझेल लागतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुपर फास्ट ट्रेनच्या तुलनेत पॅसेंजर ट्रेनमध्ये डिझेलचा खर्च जास्त असतो.
7/ 8
पॅसेंजर ट्रेनला 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 5-6 लिटर डिझेल लागतं. याचे कारण या गाडीला अनेक स्थानकांवर थांबत थांबत पुढे जावं लागतं. त्यामुळे अधिक डिझेल खर्च होतं.
8/ 8
12 कोच असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिनला 1 किलोमीटरचा मायलेज देण्यासाठी सुमारे 4.5 लिटर डिझेल लागते. ट्रेनचे मायलेज इंजिनच्या पॉवरवर अवलंबून असतं, ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार खेचणं या गोष्टी असतात. त्यामुळे तिथेही अधिक डिझेल खर्च होतं.