जगात भारताचा लांब रेल्वे प्लॅटफॉर्मच्या यादीत चौथा क्रमांक लागतो. तुम्हाला माहिती आहे का भारतात १० पैकी 7 प्लॅटफॉर्म हे सर्वात लांब आहेत.
पश्चिम बंगालमधील हुबळी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची लांबी 1,507 मीटर आहे. मार्च २०२३ पासून हा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे गोरखपूर रेल्वे स्थानक आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी १३,६६ मीटर आहे. विशेष म्हणजे आधी हे गोरखपूर जंक्शनच्या नावावर होते पण नंतर हुबळी इथे नवीन प्लॅटफॉर्म बांधल्याने गोरखपूर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (चित्र- twitter @drmubl)
केरळमधील कोल्लम रेल्वे स्थानक जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानकाची लांबी 1180.5 मीटर आहे. पश्चिम बंगालचे खरगपूर रेल्वे स्टेशन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या प्लॅटफॉर्मची लांबी 1072.5 मीटर आहे. (इमेज- twitter @KollamRailway)
अमेरिकेतील शिकागो इथे स्ट्रीट सबवे जगातील 5 वा सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी 1067 मीटर आहे. चेन्नई येथील एग्मोर रेल्वे स्थानक या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या स्टेशनची प्लॅटफॉर्म लांबी 925.22 मीटर आहे. (Image- twitter @north0fnorth)
उत्तर प्रदेशातील पीलीभीत जंक्शन, जगातील सर्वात प्लॅटफॉर्मच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी 900 मीटर आहे. तर कॅलिफोर्निया इथे ऑटो क्लब स्पीडवे स्टेशन आठव्या स्थानावर आहे. त्याची लांबी 815 मीटर आहे.
छत्तीसगडमधील बिलासपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी 802 मीटर आहे. त्याच वेळी, 10 व्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनच्या शर्टिन शटल टर्मिनलच्या प्लॅटफॉर्मची लांबी 791 मीटर आहे. याशिवाय भारतात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत, जी त्यांच्या अनेक गुणांमुळे देश-विदेशात प्रसिद्ध आहेत.