पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे बँक खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण पोस्ट ऑफिसने अनेक नियम बदलले आहेत.
पोस्ट ऑफिसमधील या बदललेल्या नियमांमुळं यापूर्वी विनामुल्य असणाऱ्या काही गोष्टींसाठी तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) ट्रांजॅक्शन चार्जेस सुधारित केले आहेत.
नवीन नियमांनुसार ग्राहकांना एकापेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. यामध्ये आधारद्वारे पोस्ट ऑफिसमधून पैसे काढणे, जमा करणे किंवा मिनी स्टेटमेंट घेणे समाविष्ट आहे.
परिपत्रकानुसार, एका महिन्यात मोफत मर्यादा ओलांडल्यास ग्राहकांना प्रति व्यवहार 20 रुपये आणि GST शुल्क भरावे लागेल.