मुंबई: केंद्र सरकारने आता आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणं अनिवार्य केलं आहे. तुमचं आधार पॅन लिंक आहे की नाही हे कसं ओळखाचं तर याची एक सोपी ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत अगदी सोप्या स्टेप्स वापरून ते शाधू शकता.
पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर ITR फाइल करता येणार नाही. याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. मात्र अजूनही 1000 रुपये दंड भरून तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक करू शकता.
केंद्र सरकारने 31 मार्च 2023 पर्यंत दंड भरून लिंक करण्याची शेवटची संधी दिली आहे. जर 31 मार्च आधी लिंक केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड बंद होणार आहे. अनेकांना आपले आधार-पॅन लिंक झाले आहे की नाही, याची माहिती नसते.
हे अगदी सहजपणे शोधताही येते. त्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर तुम्ही 'लिंक आधार स्टेटस'वर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला 'व्ह्यू लिंक आधार स्टेटस' वर क्लिक करावं लागेल. समोर एक मेसेज येईल. तिथे तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे कळेल.
incometax.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे Link Aadhaar Status पर्याय निवडा. तिथे तुम्ही पॅन आधार लिंक आहे की नाही ते पाहू शकता. जर नसेल तर तुम्ही लिंक करू शकता. त्यासाठी तुम्ही दंड देखील तिथूनच भरू शकता.