नोटाबंदीनंतर अनेकांनी घरात कॅश ठेवणं कमी केलं आहे. अनेकदा कित्येकांच्या पर्समध्येही कॅशचा तुटवडा असतो. मात्र तरीही अनेकजण सुरक्षेच्या कारणास्तव घरातच कॅश ठेवत असतात. मात्र त्यांना यासंबंधातले नियम माहिती असणं आवश्यक आहे. इनकम टॅक्सच्या नियमानुसार, तुम्ही घरात कितीही कॅश ठेवू शकता. हो तुम्ही योग्यचं वाचलं, तुम्ही कितीही कॅश घरात ठेवू शकता. परंतू... मात्र तपास अधिकाऱ्यांनी याबाबत जबाब विचारल्यास तुम्हाला त्याचा सोर्स सांगता येणं आवश्यक आहे. जर तुम्ही ते पैसे कायदेशीर पद्धतीने कमावले असतील, आणि त्याची कागदपत्र तुमच्या असतील किंवा त्याचा आयकर कर भरला असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मात्र त्या पैशांचा सोर्स सांगू शकला नाही तर तपास एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकते. जर तुम्ही पैशांचा हिशोब देऊ शकला नाही तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. इनकम टॅक्सकडून छापेमारी केली तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमच्याकडे जितकी कॅश सापडली त्याच्या 137 टक्क्यांपर्यंत टॅक्स लावला जाऊ शखतो. याचा अर्थ जितकी रक्कम आहे त्याच्या 37 टक्के रक्कमेचा दंड भरावा लागेल.