तुम्ही सेवानिवृत्तीपूर्वी नोकरी सोडल्यास, तुमचे खाते जास्तीत जास्त 36 महिने (3 वर्षे) सक्रिय राहते. या कालावधीत तुम्हाला कोणत्याही योगदानाशिवाय व्याज मिळते. समजा तुम्ही वयाच्या 52 व्या वर्षी नोकरी सोडली असेल तर तुम्हाला पुढील 36 महिने पीएफ रकमेवर व्याज मिळत राहील. त्यानंतर खाते निष्क्रिय होते.
जर पीएफ सदस्य परदेशात कायमचा स्थायिक झाला तरी तुमचे खाते निष्क्रिय होते आणि तुम्हाला व्याज मिळणार नाही.
जर ती व्यक्ती वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्त झाली आणि पुढील 3 वर्षे पीएफ खात्यातून पैसे काढले नाही तर पीएफ खाते निष्क्रिय होते.
तुम्ही नोकरीत असाल तोपर्यंत पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही. मात्र, नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारणी सुरू होते.