तुम्ही जर HDFC बँकेचं लोन घेतलं असेल किंवा लोन घ्यायचा विचार करत असाल तर थांबा. तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ केली आहे.
HDFC बँकेनं आपल्या MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. हे नवे दर 7 मार्चपासून लागू होणार आहेत. त्यामुळे ज्यांचं लोन चालू आहे, त्यांचे EMI वाढले आहेत.
एक महिन्यासाठी 8.65%, तीन महिन्यासाठी 8.70% सहा महिन्यांसाठी 8.80% एका वर्षासाठी 8.95%, दोन वर्षांसाठी 9.05% आणि तीन वर्षांसाठी 9.15% असे नवे व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
RBI ने गेल्या मे महिन्यापासून 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यानंतर आता बँकांनी आपल्या MCLR मध्ये वाढ केली आहे. EMI आणि कर्ज महाग झालं आहे.
पर्सनल लोन, कार लोन, होम लोन घेणाऱ्यांना किंवा घेतलेल्यांना EMI भरण्याचा बोजा आता आणखी वाढणार आहे.