मुंबई : ऑनलाईन गेमिंग आणि कॅसनो, हॉर्स रेसिंग यावर आता 28 टक्के GST लावला जाण्याची शक्यता आहे. GST काउन्सिलची आज यासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या विषयावर गठित केलेल्या मंत्रिगटाने आपला अहवाल सादर केला आहे. तथापि, जीओएम (मंत्री गट) मध्ये एकमत होऊ शकले नाही.
याशिवाय शनिवारी होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत इतरही अनेक अजेंडा ठरवता येतील. यामध्ये विमा पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनसवर जीएसटी सवलत देण्यासह अनेक वस्तूंवर क्लॅप नोटिफिकेशन जारी केले जाऊ शकते.