संकटकाळातील गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडं पाहिलं जातं. सोन्याच्या किंमती या दररोज आणि बाजारपेठेनुसार बदलत असतात.
सोनं आणि चांदी खरेदीसाठी तसंच सोन्याचे दागिने करण्यासाठी पुण्यातील बाजारपेठेत अनेक ऑप्शन आहेत. या बाजारात राज्यभरातील ग्राहक खरेदीसाठी येतात.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार खरेदी करण्यासाठी पुण्यातील बाजारात मोठी गर्दी आहे.
पुण्याच्या बाजारपेठेत सोन्याचे आज (16 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 58,120 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53270 रुपये आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.