मुंबई : आता तुमच्या बायको किंवा गर्लफ्रेंड किंवा आईला सोनंच गिफ्ट करुन खुश करा. व्हॅलेंटाइन डेआधी सोन्याचे दर खाली आले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला सोनं घसरलं आहे.
14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात आहे. याच निमित्ताने तुम्ही जर गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका.
सोन्याचे दर कधी नव्हे ते खाली घसरले आहेत. त्यामुळे लगेच सोन्याचा छोटा दागिना करुन तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश करा. ही संधी परत येणार नाही.
चांदीचे दरही खाली घसरले आहेत. चांदी प्रति किलो 66 हजार 204 रुपये GST वगळून मिळत आहे. त्यामुळे तुम्ही सुंदर पैजण, ब्रेसलेट किंवा एखादी छान चांदीची वस्तू देऊन प्रिय व्यक्तीला खुश करु शकता.
२२ कॅरेट सोन्याचे दर 52 हजार तर 18 कॅरेट सोन्याचा दर 42 हजार 300 रुपयांवर आला आहे. त्यामुळे सोनं खरेदीची आजची ही संधी सोडू नका. कारण रोज सोन्याचे दर बदलत आहेत. उद्या जर सोनं महाग झालं तर तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.