ऐन लग्नसराईत आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर सोन्याने गाठल्याने टेन्शन वाढलं आहे.
एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच 59000 ची पातळी ओलांडली. एमसीएक्सवर सोन्याने शुक्रवारी 59, 461 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. जागतिक आर्थिक संकटाच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्यात तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीमध्ये सुमारे 1700 रुपयांची वाढ आहे. तो 68200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.