लग्नसराईचे दिवस आहे, त्यामुळे सोनं खरेदी तर होणारच पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे आता सोनं खरेदी कसं करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता प्रत्येक दागिना करणं तर शक्य होत नाही पण मग त्यासाठी तुम्ही एक छोटीशी युक्ती वापरू शकता. त्यामुळे तुमचं सोन्याचे दागिने घालण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं.
सोन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेट असतात. हे कॅरेट सोन्याचं प्रमाण आणि शुद्धता यावर अवलंबून असतात. जसं की 24, 23,22, 20 असे कॅरेट आहेत. सध्या 22 कॅरेटचे दरही गगनाला भिडले आहेत. एक तोळ्यासाठी जवळपास 51 हजार तर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस पकडून 52,500 च्या आसपास सोनं जातंच जातं.
अशा सगळ्यात तुमच्याकडे जर थोडे पैसे खर्च करण्याची ताकद असेल तर तुम्ही 18 कॅरेटचे दागिने करू शकता. या दागिन्यांमध्ये सोन्याचं प्रमाण कमी असतं. दुसरी गोष्ट म्हणजे KDM मध्ये दागिने केले तर तुम्हाला कमी किंमतीला दागिने मिळतात. तुम्ही अशा प्रकारचे दागिने घेऊ शकता.
या शिवाय तुम्ही 14 कॅरेटमध्ये अंगठी आणि दागिने करू शकता. हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही खऱ्या हिऱ्यांऐवजी डायमंड वापरून सोन्याची किंमत कमी करू शकता.
सध्या बांगड्या किंवा गळ्यातल्या हारसाठी 1 किंवा 2 कॅरेट किंवा बेन्टेक्स ज्वेलरी वापरू शकता. हा देखील तात्पुरता पर्याय तुमच्याकडे आहे. त्यामुळे भरमसाठ लोन घेऊन सोनं करण्यापेक्षा असे काही छोटे पर्याय वापरून फक्त मंगळसूत्र सोन्यात करू शकता. त्यामुळे तुमचे खर्च कमी होतील.