उदय तिमांडे प्रतिनिधी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सोन्याच्या दरातही पाचशे रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. आज सोन्याचे भाव 59 हजार 800 रुपये तर चांदीचे भाव 74 हजार रुपये आहे.
सोन्याच्या दरातही पाचशे रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. आज सोन्याचे भाव 59 हजार 800 रुपये तर चांदीचे भाव 74 हजार रुपये आहे.
सोन्याचे दर गेल्या 100 वर्षातील सर्वोच्च स्तरावर असले तरी सोन अक्षय करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जातो आहे.
एक तोळा 24 कॅरेट सोन्यासाठी 60,820 रुपये मोजावे लागत आहेत. २२ कॅरेट सोन्यासाठी 55,750 रुपये मोजावे लागत आहेत.
आज सोन्याच्या दरात काही अंशी घसरण झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आजच्या सोन्याच्या दरांमध्ये 300 रुपयांची घट झाली आहे.
काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 61 हजार 180 रुपये होता आज तोच दर 60 हजार 850 रुपयांवर आला आहे.