जगातील सर्वात लांब आणि 27 नद्यांची सफर याशिवाय वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देत ही ही क्रूज जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्रूजला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या क्रूजचे फोटो आणि सफर नक्की कशी असेल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
2/ 7
गंगा विलास या क्रूजची सफर एक विलक्षण अनुभव असणार आहे. पर्यटन वाढवण्यासाठी खास ही क्रूज तयार करण्यात आली आहे. 3,200 किलोमीटर ही क्रूज प्रवास करणार आहे. एकूण 50 दिवस हा प्रवास असेल. यामध्ये 27 नद्यांसोबतच इतर काही खास पर्यटन स्थळांचा आनंद घेता येणार आहे.
3/ 7
यामध्ये आवश्यक सुविधा, विशेष जेवणाची सोय, सांस्कृतिक कार्यक्रमांचा मेळा इथे पाहायला मिळणार आहे. एक लक्झरी क्रूजचा अनुभव या क्रूजमध्ये पर्यटकांना अनुभवता येईल.
4/ 7
यामध्ये तुम्हाला एका दिवसासाठी साधारण २५ ते ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र क्रूजमध्ये काहींना ही टूर पूर्ण करायची नसेल किंवा काही ठराविक स्टॉप करायचे असतील तर त्याबाबत नेमके काय नियम असणार? त्याचं तिकीट किती असणार याबाबत अजून माहिती समोर आली नाही.
5/ 7
भारतातील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनानंतर पर्यटनाला आणखी चालना मिळेल हा उद्देश आहे. 13 जानेवारीला आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
6/ 7
5 स्टार हॉटेल्ससारख्या उत्तम रूम, खाण्याची सोय, याशिवाय स्मोकिंग झोन, संस्कृतीचा वारसा दाखवणारे विविध कार्यक्रम या क्रूझवर ठेवण्यात आले आहेत. 52 दिवस 3200 किलोमीटर या क्रूझचा प्रवास असणार आहे.
7/ 7
आतापर्यंत 31 प्रवाशांनी बुकिंग केलं असून ते स्विझर्लंड ट्रॅव्हल कंपनीकडून येत असल्याची माहिती मिळाली आहे.