मात्र अलीकडे देशातील महत्त्वाच्या बँकांनी एफडीवर व्याजदर कमी केला आहे. अशावेळी तुम्ही एफडी काढण्याचा विचार करत असाल तर हे माहित करुन घेणं गरजेचं आहे की कोणती बँक चांगल्या दराने एफडी ऑफर करत आहे. काही महत्त्वाच्या बँका एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या दराने एफडीवर (Fixed Deposit) व्याजदर देत आहेत.
गेल्या काही काळात छोट्या खाजगी बँकांनी देखील एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. जसं की आरबीएल बँकेने एका वर्षााच्या एफडीसाठी व्याजदर 6.5 टक्क्यांवरून कमी करत 6.10 टक्के केले आहेत. याशिवाय इंडसइंड बँकेने एका वर्षाच्या एफडीवरील व्याजदर 6.5 टक्क्यावरून 6 टक्के केले आहेत. असे असले तरीही या बँका एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वात चांगलं व्याज देत आहेत. एफडीमध्ये छोट्या बँकांकडून चांगलं व्याज मिळतं आहे. जाणून घ्या महत्त्वाच्या बँकांचे एका वर्षासाठीच्या FD वरील व्याजदर