दिवाळीच्या निमित्ताने काही कंपन्या कर्मचाऱ्यांना बोनस किंवा गिफ्ट देतात. तुम्हाला माहिती आहे का दिवाळी बोनस किंवा गिफ्टवरही टॅक्स लागतो. मात्र तुम्हाला मिळणाऱ्या बोनस किंवा गिफ्टवर टॅक्स भरावा लागणार का?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका आर्थिक वर्षात कंपन्यांकडून मिळालेल्या 5,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या भेटवस्तू किंवा व्हाउचर टॅक्स लागत नाही. मात्र 5,000 रुपयांपेक्षा जास्त असलेली कोणतीही भेट तुमच्या उत्पन्नात जोडली जाते. त्यामुळे तुम्हाला त्यावर कर भरणं बंधनकारक आहे. तुमच्या एकूण उत्पन्नानुसार टॅक्स भरावा लागेल.
समजा तुम्हाला दिवाळीत 5,000 रुपये आणि ख्रिसमसला पुन्हा 3,000 रुपयांची बोनस मिळाला किंवा तेवढ्या किंमतीची महागडी वस्तू मिळाली. अशा परिस्थितीत तुम्हाला 3,000 रुपयांच्या गिफ्टवर कर भरावा लागेल. काही कंपन्या गिफ्टच्या बदल्यात दिवाळी बोनस देतात. बोनस हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग मानला जाईल आणि त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.
मित्राकडून भेटवस्तू घेतली तर तुम्हाला अशा भेटवस्तूवर टॅक्स भरावा लागेल. समजा एखाद्या आर्थिक वर्षात रोख किंवा वस्तुरूपात मिळालेल्या भेटवस्तूचे एकूण मूल्य 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते कलम 56(2) अंतर्गत येतं ज्यामुळे त्याला टॅक्स भरणं बंधनकारक असेल. अशा परिस्थितीत, सर्व भेटवस्तूंच्या एकूण कर आकारला जाईल.
भेट म्हणून मिळालेली जमीन किंवा घर यावरही कर आकारला जाऊ शकतो. भेटवस्तूमध्ये मिळालेल्या घराचे किंवा जमिनीचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर कर आकारला जाईल.
तज्ज्ञांच्या मते, करदात्याच्या आयकर स्लॅबनुसार भेटवस्तूंवर कर आकारला जातो. त्यामुळे एखादी व्यक्ती ३० टक्के आयकराच्या जाळ्यात असेल तर त्याला भेटवस्तूंवरही ३० टक्के कर भरावा लागेल.