सध्या भारतात 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. या नोटांच्या पुढील बाजूस महात्मा गांधींचे चित्र नेहमीच असते. त्याचबरोबर त्यामागे एक स्मारकही आहे. प्रत्येक नोटवर ते वेगळे आहे. बघूया कोणत्या नोटवर कोणतं स्मारक आहे.
कोणार्कचे सूर्यमंदिर 10 रुपयांच्या नोटेवर छापलेले आहे. 13 व्या शतकात पूर्व टोळी घराण्यातील राजा नरसिंह देव पहिला यांनी बांधले होते. १९८४ मध्ये जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळाली. (फोटो- न्यूज18)
100 रुपयांच्या नोटेवर राणीची विहिर दिसते. गुजरातमधील सोलंकी साम्राज्य असताना ही असल्याचं सांगितलं जातं.
200 रुपयांच्या नोटेवर सांचीचा स्तूप दिसतो. मध्य प्रदेशात स्थित बौद्ध धर्माचा ऐतिहासिक वारसा आहे. (photo- moneycontrol)
2000 च्या नोटेवर मंगळयानाचे चित्र दिसते. २०१४ मध्ये भारताने ते मंगळावर यशस्वीरित्या पोहोचवले. अशी कामगिरी करणारा भारत हा आशियातील पहिला देश होता. (photo- news18)