सेंट्रल बँक ऑफ इंडिया 75 लाखांच्या गृहकर्जावर 20 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के व्याज दर देत आहे. त्याचा EMI 60,419 रुपये असेल.
नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) गृहकर्जासाठी 20 बेसिस पॉइंट्सचे जास्त शुल्क आकारते. त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तुलनेत बजाज फायनान्स 7.7 टक्के व्याजदरानं गृहकर्ज देत आहे. 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावरील ईएमआय 61,340 रुपये असेल.
युनियन बँक ऑफ इंडिया 7.75 टक्के व्याज दराने गृहकर्ज देत आहे. 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी तुम्हाला दरमहा 61,571 रुपये EMI भरावा लागेल.
खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक 7.99 टक्के दरानं गृहकर्ज देत आहे. ही खाजगी क्षेत्रातील बँक 8 टक्क्यांपेक्षा कमी दरानं गृहकर्ज देणार्या कर्जदारांपैकी एक आहे.
bank home loan interest आणखी एक सरकारी मालकीची IDBI बँक 20 वर्षांच्या कालावधीसह 75 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 8 टक्के व्याजदरासह गृहकर्ज देत आहे. इंडियन ओव्हरसीज बँकही त्याच व्याजदरानं गृहकर्ज देत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील LIC हाउसिंग फायनान्स कंपनी देखील गृहकर्जावर 8 टक्के व्याज आकारत आहे. अशा परिस्थितीत 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाखांच्या गृहकर्जावरील ईएमआय 62,733 रुपये असेल.
प्रमुख बँकिंग आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांप्रमाणे, आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स कंपनी देखील 8 टक्के दरानं गृहकर्ज देत आहे.
सरकारी मालकीची कॅनरा बँक गृहकर्जावर 8.05 टक्के दरानं व्याज आकारत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँकांच्या तुलनेत येथील व्याजदर तुलनेनं जास्त आहेत.