महागाईनं आधीच कंबर मोडली आहे. जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढली आहे. आता केंद्र सरकारने आरोग्य योजनांतर्गत अनेक शुल्कात वाढ केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सरकारच्या आरोग्य योजना-केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत सल्लामसलत शुल्क आणि खोलीचे भाडे वाढवले आहे.
केंद्र सरकार खासगी रुग्णालयांमध्ये योजनांतर्गत सवलत देते. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांतर्गत, ते केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि निवडक लाभार्थी गट तसेच त्यांच्या आश्रितांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करते.
या योजनांतर्गत, 42 लाख नोंदणीकृत लोक सवलतीसह खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. या योजनांतर्गत कोणते शुल्क वाढवण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.
ओपीडी सल्लामसलत शुल्क 150 वरून 350 करण्यात आले आहे. IPD सल्लामसलत शुल्क 50 ते 350 रुपयांनी वाढवण्यात आले आहे
आयसीयू सेवा आता निवासासह दररोज 5,400 रुपये निश्चित करण्यात आली आहे. खोलीचे भाडे दीड पटीने वाढले आहे. सर्वसाधारण खोल्यांसाठी 1,500 रुपये, वॉर्डांसाठी 3,000 रुपये आणि खाजगी खोल्यांसाठी 4,500 रुपये.
2014 पासून पहिल्यांदाची हे शुल्क वाढवण्यात आलं आहे. 25 ते 30 टक्के रक्कम वाढेल अशी चर्चा होती. अखेर हे शुल्कवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णालयात उपचार घेणं महाग होणार आहे.