मुंबई : HDFC बँकेपाठोपाठ आता आणखी एका बँकेनं व्याजदर वाढवलं आहे. त्यामुळे EMI आणि व्याजदर वाढल्याने ग्राहकांवर अधिकचा खर्चाचा बोझा पडणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये 15 ते 20 बेसिस पॉइंटने वाढ केली. याशिवाय रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर 7 नोव्हेंबर 2022 पासून म्हणजेच सोमवारपासून लागू झाले आहेत.
2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर वाढवण्यात आला आहेय 31 ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या FD वर व्याजदर वाढवण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी 3.25 ते 6.50 आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25 ते 7.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर मिळू शकते.