तुम्ही डुक्कर पालन करून लाखो रुपये कमवू शकता. एवढंच नाही तर तुम्ही लोकांना कामावर ठेवू शकता. या कामातून लोक आता चांगले पैसे कमवू लागले आहेत.
उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नागेंद्र प्रताप सिंग यांनी कृषी तंत्रज्ञानातून पदवी घेतल्यानंतर नागेंद्र यांनी प्रशिक्षण घेतले आणि प्रशिक्षणानंतर डुक्कर पालन सुरू केलं.
नागेंद्र सांगतात की, कृषी तंत्रज्ञानातील पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, कौशांबी, उत्तर प्रदेश इथे कृषी-क्लिनिक आणि कृषी-व्यवसाय केंद्र योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले.
या 6 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी डुक्कर पालनाचे प्रशिक्षण घेतले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डुकरांचे पालनपोषण सुरू केले.
नागेंद्र यांनी आपल्या बचतीतून 30 हजार रुपयांची गुंतवणूक करून डुक्कर पालन सुरू केलं. त्यांना यॉर्कशायर जातीची 10 लहान डुकरांची खरेदी केली. यामध्ये 2 नर आणि 8 मादी घेतल्या. यानंतर त्यांनी घरामागील वडिलोपार्जित 700 चौरस फूट जागेत वर्षभर डुकरांचे पालनपोषण केलं.
सुरुवातीला त्यांना डुकरांना खायला काय द्यायचं याची अडचण होती. त्यांनी ढाबे आणि रेस्टॉरंटशी संपर्क केला. तिथून उरलेलं अन्न मागवून त्यांना डुकरांना खाऊ घातलं, त्यामुळे खाण्याचा प्रश्न मिटला.
नागेंद्र यांनी डुकरांना किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांना विकले. त्यातून 50 हजार रुपयांचा फायदा झाला. अशाच प्रकारे डुकरांची विक्री करून त्यांनी जवळपास 16 लाखहून अधिक रुपयांचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या 60 पिलांसह डुकरांचं फार्म सध्या ते चालवत आहे.