आधीच TDS मुळे पगार कापला गेला असणार आणि आता त्यात लोनचे हप्ते जास्त जाणार, यामुळे तुमचं बजेच नक्की कोलमडणार आहे. ग्राहकांसाठी बँकेनं दणका दिला आहे. ज्यांनी लोन घेतली आहे त्यांना तर जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे.
2/ 6
जे लोन घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी तर जरा थांबाच कारण लोनचे कलेकलेनं वाढत जाणारे हप्ते पाहता तुम्हाला पगारच उरणार नाही अशी शंका येऊ लागली आहे. SBI, HDFC, बँक ऑफ बडोदा पाठोपाठ आता आणखी एका बँकेनं लोनवरील व्याजदरात वाढ केली आहे.
3/ 6
शेअर बाजार शुक्रवारी बंद झाल्यानंतर कॅनरा बँकेने मोठी घोषणा केली. बँकेनं लोनवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 0.10-0.45% ने वाढ केली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच १२ मार्च २०२३ पासून लागू होतील.
4/ 6
याआधी सरकारी बँक एसबीआयनेही कर्जाचे दर वाढवले. मार्चच्या सुरुवातीला देशातील सर्वात मोठी खासगी बँक ICICI बँकेनेही व्याजदरात वाढ केली होती. निधी आधारित कर्ज दर (MCLR) ची सीमांत किंमत 0.10% पर्यंत वाढली आहे.
5/ 6
गेल्या महिन्यात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मूळ चलनवाढीचा हवाला देत व्याजदर 0.25 टक्क्यांनी 6.5 टक्क्यांनी वाढवले.
6/ 6
या व्याजदर वाढीमुळे ज्यांनी होम, कार आणि पर्सनल लोन घेतलं आहे त्यांच्या डोक्याला ताप वाढला. कारण या महिन्याचं पूर्ण बजेट कोलमडणार आहे.