फिक्स डिपॉझिट ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पैसे आले की उचलून सरळ FD मध्ये गुंतवले असं बरेच जण करतात. ही सवय तुम्हाला पण असेल तर वेळीच सुधारा कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही जास्त रिटर्न्सला मुकण्याची शक्यता अधिक आहे.
पोस्ट ऑफिसमधील FD वर 6.8 ते 7.5 टक्के व्याजदर मिळतं, प्रत्येक वर्षाला कंपाउंडिंग इंटरेस्टचा फायदा देखील मिळतो. मात्र, इथे ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाची सुविधा मिळत नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया FD केल्यास 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 3 ते 7 टक्के व्याज मिळतं, तर ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिक व्याज मिळते. SBI च्या अमृत कलश योजनेत ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.6 टक्के व्याज मिळतं.
प्री मॅच्युअर व्हिड्रॉअलसाठी जर तुम्ही एफडी मोडायची असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमधील एफडी 6 महिन्यांच्या आधी मोडू शकत नाही. तर बँकेत तुम्ही जर ऑनलाईन FD केली तर तुम्ही मोडू शकता. पावती केली तर मात्र तुम्हाला बँकेत जाऊनच अर्ज भरून मोडावी लागेल.
जर मुदत ठेव 1 वर्षापूर्वी बंद असेल 6 महिन्यांनंतर, पोस्ट ऑफिस FD वर बचत खात्याचा व्याज दर देते. त्याच वेळी, एसबीआय मुदतीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल ग्राहकांकडून दंड वसूल करते.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केल्यावर, ग्राहकांना आयकर कायद्यांतर्गत समान प्रमाणात आयकर सूट मिळते.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडीचा कालावधी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत असू शकतो. परंतु पोस्टल पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिट उपलब्ध आहे.