पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिना हा पेन्शन धारकांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्या महिन्यात लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागतं. तुम्ही अजूनही लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर तुमच्याकडे 5-7 दिवस शिल्लक आहेत.
तिसऱ्या शनिवारी म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि नंतर रविवार म्हणून बँक बंद असणार आहे.
पुढच्या आठवड्यात चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँक बंद राहील. त्यामुळे पुन्हा कामं अडून राहू शकतात.
त्यानंतर महिना अखेर असल्याने बँकेत प्रचंड गर्दी असते. अशावेळी तुमचं पेन्शनचं काम रखडलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमच्याकडे आताच वेळ आहे.
जर बँकेत जाणं शक्य नसेल तर तुमच्या बँकेत ऑनलाइन लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा आहे का विचारा आणि ऑनलाइन जमा करा. नाहीतर पेन्शन मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.